
पेट्रोल, डिझेलच्या रोजच्या दरवाढीमुळे सामान्य जनता, मध्यमवर्गीय प्रचंड त्रस्त आहे. त्यातच आता मालवाहतूक भाडय़ात 16 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान्य, भाजी, फळांसह सर्वच वस्तूंच्या दरांचा भडका उडेल. ही महागाई आणखी किती रडवणार, असा सवाल जनता पेंद्रातील मोदी सरकारला विचारत आहे.
अवघ्या 15 दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर 9 रुपये 20 पैशांनी वाढ झाली आहे. देशातील बहुतांशी शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 115 ते 120 रुपयांवर तर डिझेल 100 रुपयांवर गेले आहे. याचा थेट परिणाम मालवाहतुकीवर होणार आहे.
डिझेलचा सर्वाधिक वापर मालवाहतूक आणि कृषी क्षेत्रात होते. त्यामुळे डिझेल महाग झाल्यास सार्वाधिक फटका या दोन्ही क्षेत्रांना बसतो. मालवाहतुकीच्या भाडय़ात तब्बल 16 टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असे मध्यप्रदेश ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे जसवीर सिंह यांनी सांगितले.
प्रवासी वाहतूकही महागणार
मालवाहतूकीप्रमाणेच प्रवासी वाहतूकही महागणार आहे. पर्यायाने याचा सर्वाधिक बोजा सामान्य जनतेवर पडणार आहे. खासगी प्रवासी गाडय़ांच्या दरात मोठय़ा प्रमाणावर भाडेवाढ होईल.
तीन वर्षांत केंद्र सरकारने कमावले 8 लाख कोटी
कोरोना महामारीमुळे नागरिकांचे दरडोई वार्षिक उत्पन्न 1.26 लाखांवरून 99155 हजारांपर्यंत खाली आले आहे. मात्र, सरकारची एक्साईज डय़ूटी (उत्पादन शुल्क) कमाई 210282 कोटी रुपयांवरून 371908 कोटी रुपये झाली. तीन वर्षांत पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज डय़ूटी सातत्याने वाढवून केंद्र सरकारने 8 लाख कोटींची कमाई केली आहे, असे वृत्त आहे.
भाजप खासदाराचा घरचा आहेर…. हा तर देशद्रोहच
रोज इंधन दरवाढ करून अर्थमंत्रालय अर्थसंकल्पातील वित्तीय तूट करून काढत आहे. इंधन दरवाढीमुळे देशात अराजक माजेल. देशात उठाव निर्माण होण्यासारखी परिस्थिती होत आहे. या परिस्थितीला अर्थमंत्रालयाचे वैचारिक दारिद्रय़ जबाबादार आहे. तसेच हा तर देशद्रोह आहे, असा हल्लाबोल करीत भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे.

























































