
डिसेंबरपासून वाढणारी महागाई सलग दुसऱया महिन्यातही वाढतच असल्याचे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. महागाईचा दर आता 0.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्य, बिगर-अन्न वस्तू, उत्पादन क्षेत्रातील विविध वस्तूंच्या किमतीत या महिन्यात वाढ झाली आहे.
उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबरमध्ये उत्पादन क्षेत्रातील वस्तू, खनिजे, यंत्रसामग्री, उपकरणे, अन्नपदार्थांचे उत्पादन आणि वस्त्रांच्या किमती वाढल्याने महागाई वाढली आहे. मात्र यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.


























































