
>> राकेश माने
उन्हाळा आला की गारगार प्यावे, खावे असे वाटू लागते. ही थंड पेये गार करण्यासाठी प्रामुख्याने रेफ्रिजरेटर वापरला जातो. असा रेफ्रिजरेटर जगात प्रथम स्काटिश गृहस्थ विल्यम क्युलेन यांनी 1755 मध्ये बनविला. त्यानंतर त्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या. 1805 मध्ये अमेरिकन संशोधक आालिव्हर इव्हान्स यांनी त्यात सुधारणा घडवली. 1820 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल पारेडे यांनीही त्यात चांगली सुधारणा केली. 1834 मध्ये जेकब पर्किन्स यांनी त्यात आणखी सुधारणा केली. 1842 मध्ये अमेरिकेच्या जान गारी यांनी काही सुधारणा केल्या. 1894 मध्ये हंगेरी देशातला संशोधक आणि उद्योजक इस्टिव्हान राक याने विजेवर चालणाऱया फ्रिजचे उत्पादन सुरू केले. 1913 मध्ये विजेवर चालणारा फ्रिज जनतेसाठी विक्रीसाठी ठेवण्यात आला. 1918 मध्ये केल्व्हिनेटर फ्रिज कंपनीने आाटोमाटिक कंट्रोल असलेला फ्रिज तयार केला. हिंदुस्थानात गोदरेज कंपनीने पहिला रेफ्रिजरेटर 1958 मध्ये बनविला. हिंदुस्थानात व्हर्लपूल ही कंपनी सगळय़ात जास्त रेफ्रिजरेटरची निर्मिती करते.