देशाची आर्थिक धोरणे लोकप्रियतेसाठी नको – नारायण मूर्ती

281

देशाची आर्थिक धोरणे ही लोकप्रियेसाठी नको तर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतील अशी असावीत. सरकारने उद्योजकांना येणारे अडथळे दूर करून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी सांगितले.

गोरखपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती यांनी सरकारच्या लोकप्रियतेपेक्षा नागरिकांना अनुकूल अशी देशाची आर्थिक धोरणे असली पाहिजेत. यासाठी या क्षेत्रातील तज्ञांचा सल्लाही विचारात घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी आम्हाला आधी धर्म, भाषा आणि जातीबाहेर येऊन विचार करावा लागेल, असे ते म्हणाले.

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था एका दिशेला वाढत असताना भयानक गरिबी, भूकबळी आणि कुपोषणाची समस्या वाढत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी आर्थिक धोरणे आखताना याचाही विचार झाला पाहिजे, असे मूर्ती यांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था दरवर्षी 6 ते 7 टक्क्यांनी वाढत आहे. आपला देश आज जगातील सॉफ्टकेअर डेक्हलपमेंटच एक प्रमुख सेंटर बनला असून परकीय चलन साठा 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या