मला न्याय मिळाला पण ताईवर अन्याय झाला – चंद्रकांत पाटील यांची कबुली

chandrakant-patil

या निवडणुकीत मला न्याय मिळाला पण ताईंवर  म्हणजेच मेधा कुलकर्णींवर मात्र अन्याय झाला अशी कबुली महसूलमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात आयोजित ब्राह्मण संघटनेच्या बैठकीत दिली. त्यांच्यावर अन्याय झाला असला तरीही त्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असेही ते म्हणाले. बैठकीला विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनीही त्यांना विविध राजकीय घडामोडींवर बोलते केले. मित्रपक्षांमध्ये असलेल्या नाराजीबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, रामदास आठवले आणि माझी सदिच्छा भेट झाली  असून मित्रपक्षांमध्ये निवडणूक चिन्हावरून कोणताही वाद नसल्याचा दावाही त्यांनी केला. कोथरूडकरांनी आपल्यावर विश्वास दाखवला तर मोकळ्या मनाने पुण्यात फिरेन, असेही पाटील म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या