हिंद महासागरात चीनकडून वाढणाऱया नौदलाच्या कारवायांना रोखण्यासाठी आता हिंदुस्थानी नौदलात दुसरी परमाणू ऊर्जाने चालणारी पाणबुडी आयएनएस अरिघाट येणार आहे. ही पाणबुडी परमाणू मिसाईलसाठी खास तयार करण्यात आली आहे. अवघ्या एक किंवा दोन महिन्यांत पाणबुडी नौदलात दाखल होईल. सहा हजार टन वजन, लांबी 113 मीटर, बीम 11 मीटर आणि ड्रॉफ्ट 9.5 मीटर असलेल्या आयएनएसचे निर्माण विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये करण्यात आले आहे. ही आयएनएस 1400 मीटर खोल पाण्यात जाऊ शकते. याची रेंज अमर्यादित आहे. सप्लाय आणि मेन्टेनन्स असेल तर ही पाणबुडी अमर्यादित काळासाठी समुद्रात राहू शकते. आयएनएस अरिघाटमध्ये आयएनएस अरिहंतसारखी 750 किमीच्या रेंजची के-15 मिसाईलसाठी जागा आहे. यामुळे हिंदुस्थानी नौदल आणखी मजबूत होईल. 7 हजार टन आयएनएस अरिदमन 3500 किमीच्या रेंजची के-04 मिसाईलसोबत पुढील वर्षी सुरू होईल.
शत्रूंचा थरकाप उडणार
हिंदुस्थानी नौदलात आयएनएस अरिघाट दाखल झाल्यानंतर शत्रूंचा थरकाप उडणार आहे. या पाणबुडीत 21 इंचाच्या सहा टोरपीडो लावण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक टोरपीडो टय़ूब्स असून समुद्रात स्पह्टके पसरवण्याचे काम करेल. या पाणबुडीच्या आत न्यूक्लिअर रिअॅक्टर लावले आहेत. जे परमाणू इंधनने पाणबुडीला 28 किमी प्रति तास, पाण्याच्या खोलमध्ये 44 किमी प्रति तासाच्या वेगाने प्रदान करेल.
– आयएनएस अरिहंत आणि आता आयएनएस अरिघाट नवी पाणबुडी नौदलात दाखल झाल्यानंतर देशाच्या दोन्ही बाजूने दुश्मनाच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देणार आहे. पाकिस्तान असो की चीन, या पाणबुडीमुळे हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. हिंदुस्थान तिसरी पाणबुडी बनवण्याची तयारी करत आहे.