इन्स्ट्राग्रामवर फोटो टाकला आणि तुरुंगात गेला

571

दादर रेल्वे स्थानकातील वेटिंग रूम प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्याला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अटक केली. अबूझर अबूबकर असे त्याचे नाव आहे. त्याने चोरलेल्या मोबाईलमधील इन्स्ट्राग्रामवर स्वतःचा फोटो टाकला होता.

अबूबकर हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी. दादर येथील वेटिंग रूममधून मोबईल चोरीला गेला. चोरीप्रकरणी त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली भरत गायकवाड यांच्या पथकाने तपास करून अबूबकरच्या मुसक्या आवळल्या.

आपली प्रतिक्रिया द्या