चंद्रपूर- आंतरजिल्हा बस सेवा सुरू होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांची माहिती

1227

मागील चार महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार असल्याची माहिती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मुख्यमंत्री यासंदर्भात अनुकूल असून चर्चाही झाली आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

ऐन संकटकाळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असून प्रसंगी मेस्मा कायदा लावणार, असा इशाराही त्यांनी दिलाय. राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्रे कोरोना नियम पाळून प्रारंभ करण्याची सरकारची तयारी आहे. ज्याप्रमाणे जिम सुरू केले, त्याच धर्तीवर कोचिंग सुरू करण्याचा विचार आहे, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या