21 जून जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी योगा दिन उत्साहात साजरा केला जात आहे. जोगेश्वरी पूर्व येथील राज योगा आणि फिटनेस स्टुडियोच्या महिलांनी येथील ‘अरविंद गंडभीर हायस्कूल’ च्या पटांगणात वेगवेगळी आसने करत योगा दिवस साजरा केला.
योगा क्लासेसचे प्रशिक्षक राजेश सिंग यांनी योगा ही काळाची गरज असल्याचे म्हंटले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यंदा 2024 या वर्षासाठी ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी थीम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही अनोख्या पद्धतीने योग दिवस साजरा केला असल्याचे राजेश यांनी सांगितले.