कराचीत मॉलला भीषण आग, 26 ठार

पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची येथील एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण अजून बेपत्ता असल्याची माहिती रेस्क्यू 1122 चे प्रवत्ते हसन उल हसीब खान यांनी दिली. या घटनेतील मृतांचा आकडा 50 च्या वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी पीडितांच्या कुटुंबीयांसाठी 10 दशलक्ष पाकिस्तानी रुपये (जवळपास 36,000 अमेरिकन डॉलर्स) नुकसानभरपाई जारी केली आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून आम्ही सर्व मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. व्यापाऱ्यांच्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबत शिफारसी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे.