सौदीत धावणार हायस्पीड ट्रेन, 12 तासांचा प्रवास आता 4 तासांत पूर्ण होणार

सौदी अरब आता देशात एक हायस्पीड रेल प्रोजेक्टचे निर्माण करत आहे. या योजनेंतर्गत सौदी अरबमध्ये स्पीड ट्रेन धावणार आहे. या प्रोजेक्टसाठी 7 अब्ज डॉलरचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टला ‘लँड ब्रिज’ असे नाव देण्यात आले आहे. सौदीचे हे व्हिजन 2030 चे आहे. या प्रोजेक्टचा उद्देश म्हणजे सौदीला एक जागतिक परिवहन पॉवर बनवणे आहे. तसेच जेद्दा आणि रियादला जोडणे आहे. ही रेल्वे लाइन लाल सागर आणि अरब सागरला थेट जोडण्यासाठी बनवली जात आहे. ‘लँड ब्रिज’ जवळपास 1500 किलोमीटर लांब असेल, जो लाल सागर येथील जेद्दाला अरब खाडीवर दम्मामला जोडला जाईल. तसेच राजधानी रियाद याचे मुख्य केंद्रबिंदू असेल. या योजनेचा सर्वात मोठा परिणाम रियाद-जेद्दा मार्गावर होईल.

सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 12 तासांचा वेळ लागतो, परंतु हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर केवळ 4 तास लागतील. या बदलाने केवळ प्रवाशांची सुविधा वाढणार नाही, तर सौदी अरबची आर्थिक आणि व्यापाऱ्यात आणखी मजबुती वाढेल. नवीन ‘लँड ब्रिज’ योजना सौदी रेल्वे कंपनी (एसएआर) साठी खूप महत्त्वाची आहे. याचा उद्देश देशाचा रेल्वे नेटवर्कचा विस्तार करणे आहे. सौदी अरबमध्ये एकूण रेल्वे नेटवर्क लांबी 5,300 किमी आहे. आता ती वाढून 8 हजार कमी करण्याची योजना आहे. या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी एसएआरने आधीच 15 नवीन ट्रेनची ऑर्डर दिली आहे. या ठिकाणी 200 किमी प्रति तास वेगाने धावेल. सौदी ‘लँड ब्रिज’ प्रोजेक्ट डिसेंबर 2030 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.