
अमेरिकेत विमान दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. अॅरिझोना राज्यातील माराना प्रादेशिक विमानतळावर दोन लहान विमानांची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख अद्याप पटू शकली नाही. दोन्ही विमाने लहान फिक्स्ड-विंग सिंगल-इंजिन विमाने होती. यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) कडून अपघाताचा तपास सुरू आहे.
टक्सनच्या बाहेरील एका विमानतळावर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे माराणा पोलिसांनी सांगितले. सेस्ना 172S आणि लँकेअर 360 MK II या दोन विमानांमध्ये टक्कर झाली असून दोन्ही दोन्ही फिक्स्ड-विंग, सिंगल-इंजिन विमाने असल्याचे NTSB ने सांगितले.

























































