माधुरी बनली योगगुरू

अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिच्या फिटनेस आणि नृत्याच्या कौशल्यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या तिचे योगासनांचे व्हिडियो जोरदार व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून माधुरी चाहत्यांना आणि फॉलोअर्सला इन्स्टाग्राम व्हिडियोच्या माध्यमातून योगासनं शिकवणार आहे. तिने तिचे योगासनांचे व्हिडियो शेअर केले आहेत. ‘डेली योगा विथ मी’ असे नाव तिने सिरीजला दिले आहे.

माधुरीने योग व्हिडियो शेअर करताना लिहिलंय, सुरुवातीपासूनच योगा मला प्रिय आहेत. योगा हा माझ्या फिटनेसचा भाग आहे. आता आंतरराष्ट्रीय योग दिन येणार आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला काही सोपी योगासनं दाखवणार आहे.

माधुरीने सुरुवातीला मुद्रासनाचा व्हिडियो अपलोड वरून आसनाची माहिती आणि फायदे सांगितले आहेत. माधुरीने दोन्ही पाय पूर्ण दुमडून पुढं वाकून, डोकं जमिनीला टेकवून मुद्रासन केलं आहे. हे आसन पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर आहे, असं तिने सांगितलंय. त्यानंतर भुजंगासन, धनुरासन, अधोमुखश्वानासन, तुलासन यांचा व्हिडियो शेअर करून त्यांचे लाभ सांगितले आहेत. इन्स्टाग्रामवर माधुरीचे सुमारे 24 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ते माधुरीच्या व्हिडियोंना चांगला प्रतिसाद देत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या