अमेरिकेत हिंदुस्थानी सीईओने केली 4 कोटींची फसवणूक

अमेरिकेतील हिंदुस्थानी वंशाचे टेलिकॉम कंपनीचे सीईओ बंकिम ब्रह्मभट यांच्यावर तब्बल 4 हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या घोटाळ्यात आघाडीची इन्व्हेस्टमेंट कंपनी एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर आणि जागतिक पातळीवरील असेट मॅनेजमेंट ’ब्लॅक रॉक’ यांच्या फंडचाही समावेश आहे. ब्रम्हभट यांनी बनावट ग्राहक खाती आणि महसूल दस्तऐवज तयार करून अमेरिकन बँकांकडून मोठी कर्ज मिळवली. ऑगस्ट 2024 मध्ये कर्जदारांनी असा दावा केला की, ब्रह्मभट यांनी हमी म्हणून अस्तित्वात नसलेले महसूल स्रोत कर्जाची हमी म्हणून गहाण ठेवले. एचपीएसने सप्टेंबर 2020 मध्ये ब्रह्मभट्ट यांच्या एका कंपनीला कर्ज देण्यास सुरुवात केली आणि 2021 च्या सुरुवातीला ही रक्कम हळूहळू वाढली.