कश्मीरमध्ये फक्त एका आठवडय़ासाठी इंटरनेट

310

कश्मीर खोऱयाला विशेष अधिकार देणारे कलम-370 हटविण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांत फक्त एका आठवडय़ासाठी इंटरनेटची परवानगी देण्यात आली आहे. कश्मीर प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जम्मूतील काही भागांमध्ये मोबाईल इंटरनेट आणि ब्रॉडबॅण्ड काही प्रमाणात सुरू केले. मात्र येथील सोशल माध्यमांवर अजूनही निर्बंध कायमच आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-कश्मीर प्रशासनाला राज्यातील निर्बंधांची समीक्षा करण्याचा आदेश दिल्यानंतर येथील निर्बंध हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत. सध्या तरी केवळ सरकारी कार्यालये आणि काही खासगी संस्थांनाच इंटरनेटचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र नेटचा दुरुपयोग झाल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्याकडून नेट काढून घेतले जाणार आहे. जम्मू-कश्मीरातील ब्रॉडबॅण्ड आणि टुजी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली असली तरी ती केवळ सात दिवसांसाठी आहे. इंटरनेट सेवा देणाऱया कंपन्या केवळ मोठय़ा संस्था, रुग्णालये, बँका आणि सरकारी कार्यालयांना आठवडाभरासाठीच ही सुविधा देणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या