तुम दिल की धडकन हो!

3183

आपला जोडीदार – डॉ. नीता पांढरीपांडे
लग्नाचा वाढदिवस – 11 फेब्रुवारी
आठवणीतला क्षण – पहिल्या मुलाचा आशीषचा जन्म. नीता आणि आशीष दोघांनीही एकाच वर्षी पी.एच.डी मिळवली तो क्षण.
त्यांचे दोन शब्दांत कौतुक – अत्यंत परिपूर्ण आहे ती. तिच्या सासरी आणि माहेरी दोन्ही कुटुंबांत, विद्यापीठाच्या सर्वाधिक पदव्या मिळवलेली एकमेव व्यक्ती.
त्यांचा आवडता पदार्थ – ती मांसाहारी, मी शाकाहारी. आमच्या आवडीनिवडी भिन्न आहेत.
एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ – खास पद्धतीची बाकरवडी. ताज्या कोथिंबीरीची.
वैतागतात तेव्हा – व.पुं. चे ‘जीवन म्हणजे सहन’ हे वाक्य आठवायचे.
त्यांच्यातली कला – ती लग्नाआधी उत्तम खेळाडू होती. लग्नानंतर तिने माझ्dयासाठी बऱयाच तडजोडी स्वीकारल्या. शेरशायरी, गजलांची आवड, वाचन, लेखन भरपूर करते. कोणतही काम जीव ओतून करण्याचा स्वभाव आहे. कसलाही अनुभव नसताना तिने दहा वर्षे इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये अकॅडमिक को-ऑर्डिनेटर म्हणून काम केले.
त्यांच्यासाठी गाण्याची ओळ – रंग माझा दिला, गंध माझा दिला… मी दिला गं तुला श्वास श्वासातला…
तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान – दिल की धडकन.
भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल – लग्नापूर्वीचे ‘पत्रांजली’ लेखन काळातले.
आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट – खास नाही. आम्हाला परमेश्वराने न मागताच भरपूर दिले. कसलीही खंत नाही. आणखीन काही मागणे नाही. एकमेकांसोबत साथ कायम राहूदे हीच प्रार्थना.

आपली प्रतिक्रिया द्या