अणुशक्तीनगर विधानसभेतील युवासेना विभाग युवा अधिकारी पदाकरिता उद्या मुलाखत

अणुशक्तीनगर विधानसभेतील युवासेना विभाग युवा अधिकारी पदाकरिता सोमवार, 17 जून रोजी सायंकाळी 6 वाजता युवासेना मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना भवन, दादर येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत.

युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचे सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येईल, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.