कलिना विधानसभेतील युवासेनेच्या युवकांच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यासाठी रविवार 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना शाखा क्र. 90, गिता विहार हॉटेलजवळ, कलिना सांताक्रुझ पूर्व येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक उमेदवारांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.



























































