सचिन कुर्मी हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

अजित पवार गटाचे भायखळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुह्यातील सर्व कागदपत्रे आणि आरोपीचा ताबा गुन्हे शाखेकडे सोपवण्यात येणार आहे. गेल्या शुक्रवारी सचिन कुर्मी याची भायखळा येथील घोडपदेव येथे अज्ञात व्यक्तीने हत्या केली होती. कुर्मी याच्या हत्येप्रकरणी भायखळा पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी तपास करून आनंदा काळे, विजय काकडे आणि प्रफुल पाटकरला ताब्यात घेऊन अटक केली होती. चौकशीत त्याने कुर्मी याची हत्या केल्याची कबुली दिली होती. कुर्मी याची हत्या ही पूर्ववैमनस्यातून झाली होती. हत्येनंतर ते तिघे पळून गेले होते. त्या तिघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुर्मी याच्या हत्येप्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. भेट घेऊन हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.