12 वर्षांपूर्वी पाण्यात पडला होता आयफोन, वाचा पुढे काय घडलं…

अॅपल या कंपनीची उत्पादने बाजारात सर्वात विश्वासार्ह मानली जातात. अॅपलचा आयफोन पाण्यात पडल्याच्या घटना आपण ऐकतो, मात्र नुकतीच अनेक वर्षे पाण्यात असलेला आयफोन चालू स्थितीत सापडल्याची आश्चर्यकारक घटना नुकतीच घडली आहे.

अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील मॅडिसन येथे ही घटना घडली. एका स्कुबा क्लबला हा अनेक वर्षे पाण्याखाली पडलेला आयफोन सापडला तेव्हा प्रत्येकाला याबाबत आश्चर्य वाटले, कारण तो आयफोन चालू स्थितीत होता. महत्त्वाचे कोणत्याही समस्यांशिवाय तो वापरणे शक्य होते.

गिझमोचीनामधील एका वृत्तानुसार, मेंडोटा तलावातील पर्यावरण स्वच्छता कार्यात स्कुबा क्लबचा सहभाग होता. तेव्हा पाण्याखालील स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांना अनेक मोबाईल फोन्स सापडतात, मात्र पाण्याबाहेर काढल्यानंतर हे फोन बंद पडलेले असतात. हे फोन्स चार्ज करण्याचा प्रयत्न केला जातो, पण काहीच उपयोग होत नाही, मात्र नुकत्याच सापडलेल्या आयफोनने हा प्रकार मोडून काढला आहे.

फोर लेक्स स्कुबा क्लबचे अध्यक्ष एलेन इव्हान्स यांनी हा प्रसंग शेअर केला आहे. त्यांना सापडलेला आयफोन त्यांनी चार्ज करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची स्क्रीन उजळताना दिसली. हा 12 वर्षे पाण्याखाली पडलेला असूनही तो चालू स्थितीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आयफोन 12 प्रभावी IP68 रेटिंगसह पाण्याच्या प्रतिकारशक्तीचा सामना करू शकतो. यामुळे धुळीपासून त्याचे संरक्षण होते आणि अंदाजे 30 मिनिटे तो पाण्यात राहिला तरीही बंद पडत नाही.

स्कूबा क्लबला सापडलेला सापडलेला हा आयफोन 12 पाण्याखाली राहूनही चालू स्थिती असल्यामुळे एलेन इव्हान्स यांनी आनंदाने आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी आयफोनचा मालक शोधण्याकडे लक्ष एकाग्र केले. अधिकारी फोनमधील माहिती शोधण्यास सक्षम होते. त्यामुळे त्यांनी एली आयझेनबर्ग या आयफोनच्या मालकाला शोधून काढले.