IPL 2020 – चेन्नईच्या नावावर 3 लाजिरवाणे विक्रम, आयपीएल इतिहासात पहिल्यांदा असे घडले

शारजाहच्या मैदानावर मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 10 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला बोल्ट आणि बुमराह जोडीने सुरुवातीला जोरदार धक्के दिले.

चेन्नईचे 4 फलंदाज फक्त 3 धावांत बाद झाले. यानंतर चेन्नईचा डाव शेवटपर्यंत सावरला नाही. चेन्नईने 20 षटकात 9 बाद 114 धावा केल्या. हे आव्हान मुंबईने एकही गडी न गमावता पूर्ण केले.

आयपीएल इतिहासात पहिल्यांदा असे घडले

चेन्नई सुपर किंग्ज 3 वेळची विजेती टीम आहे. आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासात टॉपचे 4 फलंदाज फक्त 3 धावांवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी आयपीएल 2013 ला मुंबईविरुद्ध चेन्नईची अवस्था 3 बाद 3 धावा अशी झाली होती. तसेच आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच धोनीला दुसऱ्या षटकात फलंदाजीसाठी उतरावे लागले.

सर्वात कमी धावांत 4 विकेट्स

आयपीएलमध्ये सर्वात कमी धावांत आघाडीचे 4 फलंदाज गमावण्याच्या यादीत चेन्नईने स्थान मिळवले. याआधी 2011 ला डेक्कन चार्जर्सने कोची टस्कर्सचे 4 गडी 2 धावांत बाद केले होते, तर राजस्थानने 2014 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची 4 बाद 5 धावा अशी अवस्था केली होती.

दुसऱ्यांदा गमावले 3 धावांत 3 विकेट्स

आयपीएल इतिहासात 3 धावांत 3 किंवा त्याहून जास्त बळी गमावण्याची चेन्नईची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2013 ला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नईच्या संघाने 3 धावांत 3 बळी गमावले होते. अशी कामगिरी दोनदा नोंदवणारा चेन्नई पहिला संघ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या