IPL 2020 – धवनचे खणखणीत शतक, दिल्लीचा चेन्नईवर अखेरच्या षटकात रोमहर्षक विजय

शनिवारी दुसऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 5 विकेट्सने पराभव केला. दिल्लीकडून शिखर धवनने नाबाद 101 धावा करत खणखणीत शतक ठोकले. अखेरच्या षटकात 17 धावांची गरज असताना अक्षर पटेलने जडेजाला 3 षटकार खेचत दिल्लीला शानदार विजय मिळवून दिला. या विजयामुळे दिल्ली पुन्हा नंबर एकवर पोहोचली, तर चेन्नईपुढे आता स्पर्धेतून बाहेर होण्याचा धोका आहे.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने 20 षटकात 4 बाद 179 धावा करत दिल्ली कॅपिटल्स समोर विजयासाठी 180 धावांचे आव्हान ठेवले. चेन्नईकडून सलामीवीर डु प्लेसिसने 58, वॉटसनने 36, रायडूने 24 चेंडूत 4 षटकार ठोकत नाबाद 45 आणि जडेजाने 13 चेंडूत 4 षटकार ठोकत नाबाद 33 धावांची खेळी केली. दिल्लीकडून नॉर्खला 2, रबाडा आणि देशपांडेला प्रत्येकी 1 बळी मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या