IPL 2020 – ‘तो’ संघ कधीच ट्रॉफी जिंकू शकत नाही, डेव्हिड वॉर्नरने बोलून दाखवलं

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेचा आज अखेरचा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात रंगणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्लीचा संघ दुसऱ्या क्वालिफायर लढतीत सनरायझर्स हैद्राबाद संघाचा पराभव करून फायनलमध्ये पोहोचला आहे. हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला हा पराभव पचलेला नाही.

दिल्लीकडून 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर डेव्हिड वॉर्नर याने जो संघ झेल सोडतो तो कधीच ट्रॉफी जिंकू शकत नाही असे म्हटले. दिल्लीविरुद्ध हैद्राबाद संघाने अनेक सोपे झेल सोडले आणि खराब क्षेत्ररक्षण केले. याचा तोटा त्यांना झाला.

गोलंदाजी आणि फलंदाजीत खराब सुरुवात केल्यानंतर आम्ही पुनरागमन केले, मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्ही सामना गमावला, असे वॉर्नर म्हणाला. या लढतीत सर्वाधिक धावा केलेल्या शिखर धवनला आणि स्टोयनिसला जीवदान मिळाले.

सुरुवातीपासून आम्हाला कोणी विजेतेदाचा दावेदार मानले नव्हते. सर्वच मुंबई, दिल्ली आणि आरसीबीबाबत बोलत होते, असे वॉर्नर म्हणाला. खेळाडूंच्या दुखापतीमुळे आम्ही थोडे अडकलो, मात्र आम्ही चांगला खेळ केला आणि याच आम्हाला गर्व असल्याचे तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या