IPL 2020 -‘सुपर’ संडे, कोलकाताने हैद्राबादचा सुपर ओव्हरमध्ये केला पराभव, फर्ग्युसनचा बळींचा ‘पंच’

रविवारी झालेल्या पहिल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैद्राबाद संघाचा ‘सुपर ओव्हर’मध्ये पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनने फक्त 2 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. कोलकाताच्या संघाने हे आव्हान लिलया पार केले. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या फर्ग्युसनने संपूर्ण लढतीत 5 बळी घेतले.

तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 163 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैद्राबाद संघ देखीप 20 षटकात 6 बाद 163 धावाच करू शकला. अखेरच्या षटकात विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 3 चौकार ठोकले. मात्र शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना रसेलने फक्त 1 धाव दिल्याने सामना टाय झाला. वॉर्नर 47 धावा काढून नाबाद राहिला.

आपली प्रतिक्रिया द्या