IPL 2020 – काय बकवास आहे… ‘त्या’ विधानानंतर दिग्गज खेळाडूने धोनीला फटकारले

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा संघ गटांगळ्या खात आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना गमावल्याने तीन वेळचा विजेता चेन्नईचा संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर झाला आहे. अशातच सामना संपल्यानंतर एम.एस. धोनीने केलेल्या एका विधानामुळे त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे. टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनीही धोनीला फटकारले आहे.

राजस्थानविरुद्ध चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना दत्त 125 धावा केल्या. जोस बटलर याने नाबाद 70 धावा करत राजस्थानला विजयी केले. सामना संपल्यावर बोलताना धोनीने संघातील तरुण खेळाडूंवर प्रतिक्रिया देताना ‘तरुण खेळाडूंमध्ये काही चमक नाही दिसली त्यामुळे संघात बदल केले जातील’, असे म्हटले. यावर श्रीकांत यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘काय बकवास आहे’, असे म्हटले आहे.

जगदिशन सारख्या खेळाडूसाठी तुम्ही तरुणांमध्ये चमक नसल्याचे बोलत आहेत. केदार जाधवमध्ये चमक आहे? पियुष चावलाने चमक दाखवली? हे बकवास आहे’, असे म्हणत श्रीकांत यांनी धोनीला फटकारले आणि त्याच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटले. तसेच संघ निवडीची प्रक्रियाच चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

धोनीने तरुणांना जास्त संधी द्यायला हवी होती असे म्हणत श्रीकांत पुढे म्हणाले की रॉयल्स विरुद्ध धोनीने करण शर्मा ऐवजी पियुष चावलाला संघात स्थान दिले. परंतु करण शर्मा कमीत कमी विकेट्स तरी घेत होता. तसेच धोनी महान खेळाडू आहे मान्य, परंतु खेळावर पकड बसत नाही या विधानाशी आपण असहमत असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या