IPL 2020 – बंगळुरूने राजस्थानला चिरडले, 8 विकेट्सने दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) झालेल्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स संघाचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला. राजस्थानच्या संघाने विजयासाठी दिलेले 154 धावांचे आव्हान 2 गडी गमावून पूर्ण केले. बंगळुरू कडून कर्णधार विराट कोहली याने नाबाद 72 तर तरुण खेळाडू देवदत्त पडीकल याने 63 धावांचे योगदान दिले. या विजयासह बंगळुरूचा संघ गुणतालिकेत नंबर वनवर पोहोचला आहे.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 6 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. राजस्थान कडून लॅमरोर याने सर्वाधिक 47 धावा केल्या. राहुल तेवतीया याने 24 आणि जोस बटलर याने 21 धावांची खेळी केली. बंगळुरू कडून युझवेंद्र चहल याने सर्वाधित 3, उडानाने 2 आणि नवदीप सैनी याने 1 बळी घेतला.