IPL 2021 बंगळुरुच्या हर्षल पटेलची कमाल, मुंबईविरुद्ध नोंदवली हॅटट्रीक

सुपर संडेच्या दिवशी झालेल्या दुसऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले. या लढतीत बंगळुरुचा मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल याने कमाल केली. पटेलने लागोपाठच्या तीन चेंडूवर मुंबईच्या तीन खेळाडूंचा बळी घेत हॅटट्रीकची नोंद केली. त्याने हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड आणि राहुल चहर यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये याआधी लक्ष्मीपती बालाजी, अमित मिश्रा, मखाया एन्टिनी, युवराज सिंह, रोहित शर्मा, प्रविण कुमार, अजित चंदिला, सुनिल नारायण, प्रविण तांबे, शेन वॉटसन, अक्षर पटेल, सॅम्यूल बद्री, अॅड्र्यू टाय, जयदेव उनाडकट, सॅम करण आणि श्रेयस गोपाल यांनी अशी कामगिरी केली आहे.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 6 बाद 165 धावा केल्या. विराट कोहली याने 51 तर ग्लेन मॅक्सवेल याने 56 धावा केल्या. बंगळुरुने दिलेले 166 धावांचे आव्हान मुंबईला पेलवले नाही. मुंबईचा संघ 111 धावांमध्ये गारद झाला. या पराभवामुळे गतविजेत्या मुंबईची गुणतालिकेत सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या