IPL चा मिनी लिलाव 18 फेब्रुवारीला चेन्नईत

आयपीएलचा मिनी लिलाव येत्या 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडणार आहे. आयपीएल आयोजकांकडून सोशल साइटवर याबाबत माहिती देण्यात आली. आयपीएल लिलावासाठी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठ संघांकडे 196.6 कोटी असणार आहेत. सर्वात जास्त रक्कम किंग्ज इलेव्हन पंजाबकडे (53.20 कोटी) असून सर्वात कमी रक्कम कोलकाता नाईट रायडर्स (10.75 कोटी) व सनरायझर्स हैदराबाद (10.75 कोटी) या दोन संघांकडे आहे.

8 संघांनी 57 खेळाडूंना सोडले

आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या आठ संघांनी 57 खेळाडूंना रिलीज केले. अर्थातच सोडून दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सर्वाधिक 10 खेळाडूंना रिलीज केले. तसेच किंग्ज इलेव्हन पंजाबने नऊ, राजस्थान रॉयल्सने आठ, मुंबई इंडियन्सने सात, चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाइट रायडर्स या संघांनी प्रत्येकी सहा आणि सनरायझर्स हैदराबादने पाच खेळाडूंना बाहेर केले.

139 खेळाडू रिटेन केले

आयपीएलमधील आठ संघांनी 483.19 कोटींच्या मोबदल्यात 139 खेळाडू रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आगामी लिलावासाठी त्यांच्याकडे 196.6 कोटी उपलब्ध आहेत. यावेळी संघाकडे ट्रान्सफर विंडोचाही पर्याय असणार आहे. या विंडोनुसार खेळाडू आपल्या मर्जीने फ्रेंचायझीची अदलाबदली करू शकतात. पण यासाठी 4 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आयपीएल लिलावासाठी संघ मालक सज्ज

संघ                    किती रक्कम बाकी

किंग्ज इलेव्हन पंजाब 53.20 कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू      35.90 कोटी

राजस्थान रॉयल्स       34.85 कोटी

चेन्नई सुपरकिंग्ज        22.90 कोटी

मुंबई इंडियन्स           15.35 कोटी

दिल्ली कॅपिटल्स        12.90 कोटी

कोलकाता नाईट रायडर्स   10.75 कोटी

सनरायझर्स हैदराबाद 10.75 कोटी

आपली प्रतिक्रिया द्या