IPL 2025 – हिंदुस्थान अलर्ट! आयपीएल मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामना धर्मशाळावरून अहमदाबादला हलवला

हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर आता संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या आयपीएलवरही झाला असून धर्मशाळा येथे होणारा मुंबई विरुद्ध पंजाब सामना अहमदाबाद येथे शिफ्ट करण्यात आला आहे.

हा सामना रविवारी 11 मे रोजी धर्मशाला येथील मैदानावर होणार होता. मात्र आता हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर तो अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हलविण्यात आला आहे. हा सामना नियोजित वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल.

ईडन गार्डन्सवर बॉम्ब ठेवल्याचा मेल

ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना सुरू असताना मैदानावर बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारा ईमेल पश्चिम बंगाल क्रिकेट बोर्डाला आला. त्यानंतर ईडन गार्डन्सची सुरक्षा वाढवण्यात आली.