
हिंदुस्थान आणि पाकिस्तान मधील तणाव अत्यंत शिगेला पोहोचला असून नियंत्रण रेषेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून हिंदुस्थानी हद्दीत ड्रोनद्वारे हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे हल्ले परतवून लावले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे धर्मशाळेत सुरू असलेला आयपीएलचा सामना रद्द करण्यात आला आहे. मैदानातील सर्व फ्लड लाइट्स बंद करण्यात आले आहेत.
इंडियन प्रीमियर लीग मधील 58 वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात धर्मशाळा येथे सुरू होता. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 10.1 षटकांमध्ये बिनबाद 122 धावा चोपल्या. पण याच वेळी सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या आणि हवाई हल्ल्याच्या भीतीने धर्मशाळेतील सामना थांबवण्यात आला आहे. मैदानातील सर्व फ्लड लाईट्स बंद करण्यात आले असून खेळाडूंना पवेलियनमध्ये नेण्यात आले आहे