
पूर्ण आयपीएलमध्ये चाचपडत खेळणाऱ्या ऋषभ पंतने अखेरच्या सामन्यात शतकी धमाका करून लखनौच्या चेहऱयावर हास्य उमलले नाही. कर्णधार जितेश शर्माने अवघ्या 33 चेंडूंत 85 धावांती त्सुनामी खेळी करत बंगळुरूला 228 धावांचे अवघड आव्हान 8 चेंडू आधीच गाठून दिले आणि त्याने संघासाठी विजय अक्षरशः खेचून आणला. या विजयाच्या जोरावर त्याने बंगळुरूला गुणतालिकेत टॉप-टू स्थान मिळवून दिले. आता शुक्रवारी बंगळुरू विरुद्ध पंजाब अशी क्वालिफायर 1 लढत रंगेल तर 30 मे रोजी मुंबईला एलिमिनीटर लढतीत गुजरात टायटन्सशी भिडावे लागेल.
ऋषभ पंतच्या शतकी घणाघाताच्या जोरावर लखनौने बंगळुरूविरुद्ध 228 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करतना फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने 61 धावांची सलामी दिली. कोहलीने स्पर्धेतील आठवे शतक झळकावताना 600 धावांचा टप्पाही गाठली. विल ओरुर्कने सलग चेंडूंवर रजत पाटीदार आणि लियाम लिव्हिंगस्टोनला बाद करत सामन्यात चुरस आणली. मग कोहलीही 54 धावांवर बाद झाला. तेव्हा बंगळुरूला 52 चेंडूंत 105 धावांचे लक्ष्य गाठायचे होते आणि नशीबवान कर्णधार जितेश शर्मा आणि मयांक अगरवालने 44 चेंडूंत 107 धावांची अभेद्य भागी रचत बंगळुरूला संस्मरणीय विजय मिळवून दिला. जितेशने 33 चेंडूंत 6 षटकार आणि 8 चौकार खेचत 85 धावा चोपल्या तर अगरवालने 23 चेंडूंत 41 धावांची साथ दिली.
पंतचा शतकीविराम
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा असलेला ऋषभ पंत लखनौसाठी खूपच महागडा ठरला होता. पूर्ण स्पर्धेत 0, 15, 2, 2, 21, 63, 3, 0, 4, 18, 7, नाबाद 16 अशा अपयशी खेळ्या करणाऱया पंतने अखेर आपल्या बॅटचा तडाखा प्रतिस्पर्ध्यांना दिला. अठराव्या आयपीएलचा शेवटचा सामना खेळत असलेल्या पंतने 61 चेंडूंत 118 धावांची नाबाद खेळी साकारत संघाला 3 बाद 227 अशी जबरदस्त धावसंख्या उभारुन दिली. त्याने या खेळीत 8 षटकार आणि 13 चौकार खेचले. तसेच मिचेल मार्शसह (67) दुसऱया विकेटसाठी 152 धावांची भागी रचली. स्पर्धेत पूर्णपणे निराश करणाऱ्या पंतने आपले शतक पूर्ण होताच मैदानात कोलांटउडय़ा मारत आपला आनंद साजरा केला. तसेच निकोलस पूरनबरोबर 49 धावा ठोकून काढल्यामुळे लखनौला 227 धावा काढता आल्या.