
क्रिकेट जगतात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा यंदा अधिकच भव्य स्वरूपात होणार आहे. २८ मार्चपासून सुरू होणारा १९वा हंगाम हा आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हंगाम ठरणार असून, तब्बल ८४ सामन्यांचा ‘महाधमाका’ रंगणार आहे. ३१ मे रोजी अंतिम लढत होणार असून, क्रिकेटप्रेमींसाठी हा दोन महिन्यांचा थरारक उत्सव ठरणार आहे.
उद्घाटनालाच गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘हायव्होल्टेज’ सामना रंगणार आहे. पहिल्याच दिवशी मैदान तापणार, यात शंका नाही. दरम्यान, देशातील – निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बीसीसीआयने सावध पवित्रा घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात फक्त २० सामन्यांचे – वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, पुढील कार्यक्रम टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे.
रायपूरला पुन्हा आयपीएलची चाहूल
यंदाचे सामने देशातील १३ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. १० पैकी ७ संघांनी प्रत्येकी एक होमग्राऊंड निवडला आहे, तर बंगळुरू, पंजाब आणि राजस्थान या संघांकडे प्रत्येकी दोन होमग्राऊंड आहेत. शहिद वीर नारायण सिंग स्टेडियम येथे तब्बल १३ वर्षांनंतर आयपीएल सामना रंगणार आहे. या मैदानाला आरसीबीने आपले दुसरे होमग्राऊंड म्हणून निवडले आहे. येथे शेवटचा सामना २०१३ मध्ये दिल्ली आणि कोलकाता यांच्यात झाला होता.
१० संघ, ८४ सामने स्पर्धा की ‘युद्ध’?
यंदा चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स व सनरायझर्स हैदराबाद हे १० संघ मैदानावर कौशल्य पणाला लावताना दिसतील. प्रत्येक संघ १६ सामने खेळणार असल्याने म्हणजेच प्रत्येक सामना ‘करो या मरो’ असेल.
प्ले ऑफची धामधूम
अंतिम टप्प्यात २६ मे रोजी क्वॉलिफायर-१, २७ मे रोजी एलिमिनेटर, २९ मे रोजी क्वॉ लिफायर-२ आणि ३१ मे रोजी अंतिम सामना अशी वेळापत्रकाची संभाव्य रूपरेषा असेल. अंतिम लढत पुन्हा बंगळुरूमध्येच रंगणार, म्हणजे शेवटपर्यंत थरार हमखास दिसणार आहे.
यंदाचे कडक नियम
सामन्याच्या दिवशी सरावाला पूर्ण बंदी. थेट मैदानात उतरा आणि लढा. खेळाडूंना फक्त टीम बसनेच प्रवास. ‘व्हीआयपी’ मोकळीक संपली. खेळाडूंच्या कुटुंबीयांना केवळ हॉस्पिटॅलिटी झोनमध्येच प्रवेश असेल. सर्व स्टाफ सदस्यांकडे आयडी कार्ड बंधनकारक. डगआउटमध्ये कुटुंबीयांना प्रवेश नाही. फक्त खेळावर फोकस. ऑरेंज व पर्पल कॅपधारक खेळाडूंना सामन्यादरम्यान कॅप घालणे बंधनकारक



























































