
हिंदुस्थानचे माजी फिरकीपटू आणि दिग्गज समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णनन यांनी तडकाफडकी BCCI च्या समालोचन पॅनलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. अवघ्या काही दिवसांनी IPL 2026 चा थरार सुरू होणार असून यापूर्वीत शिवरामकृष्णनन यांनी निवृत्ती घेतल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधान आलं आहे.
लक्ष्मण शिवरामकृष्णमन यांनी एक्सवर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. “मी आता BCCI साठी समालोचन करण्यापासून निवृत्त होत आहे.” असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे त्यांनी आपल्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तसेच BCCI च्या कार्यप्रणालीवर प्रश्चचिन्हही निर्माण केलं आहे. त्यांनी अजून एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “जर मागील 23 वर्षांत मला नाणेफेक आणि सादरीकरणासाठी संधी मिळाली नसेल आणि नवीन येणारे ते करत असतील, तर याचे कारण काय असू शकते?” असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपल्याला दुर्लक्ष केल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच अलीकडील काही वर्षांमध्ये रवी शास्त्री आणि हर्ष भोगले यांच्या सारख्या समालोचकांना महत्त्वाच्या भुमिका देण्यात आल्या. मात्र, शिवरामकृष्णन यांना या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात आल्याच त्यांच्या पोस्टमधून दिसून येत आहे.
I am retiring from commentary for BCCI
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 20, 2026
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू आर. अश्विनही अवाक झालाय. 60 वर्षीय लक्ष्मण शिवरामकृष्णन 1985 च्या विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या हिंदुस्थानी संघाचा भाग होते. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये हिंदुस्थानसाठी 9 कसोटी सामने आमि 16 वनडे सामने खेळले आहेत. शिवरामकृष्णन यांना आंतरराष्ट्ररीय स्तरावर चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेट आणि कॉमेंट्रीच्या माध्यमातून त्यांचा क्रिकेटशी अगदी जवळचा संबंध राहिला आहे.
If I have not been used for TOSSES and PRESENTATION for 23 years and new comers come in do pitch report Tosses Presentation even when Shastri was coaching, what do you think could be the reason
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 20, 2026
























































