
IPL 2026 चा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘क्रिकबझ’ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये पाटीदारला आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधाराबद्दल विचारण्यात आले असता, त्याने आपला सहकारी विराट कोहली याचे नाव न घेता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याची निवड केली. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला 2013 ते 2020 दरम्यान पाच वेळा जेतेपद मिळवून दिले असून 89 सामन्यांत विजय मिळवला आहे, ज्यामुळे त्याला आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानले जाते.
कर्णधारपदासाठी रोहितची निवड केली असली तरी, पाटीदारने सर्वोत्तम फलंदाज म्हणून मात्र विराट कोहली यालाच पसंती दिली आहे. आयपीएलमध्ये 8,730 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कोहलीचा विक्रम पाहता पाटीदारने त्याला सर्वोत्तम मानले. केवळ फलंदाजीच नव्हे, तर ‘सर्वोत्तम कव्हर ड्राईव्ह’ कोणाची आहे, या प्रश्नावरही त्याने कोहलीचेच नाव घेतले. कोहलीच्या बॅटिंगमधील सातत्य आणि त्याचे 8 शतकी विक्रम हे त्याला या स्पर्धेतील ‘किंग’ सिद्ध करतात, असेच पाटीदारच्या निवडीवरून स्पष्ट होते.
IPL 2026 – पहिल्या षटकाचा नवा बादशहा, मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्याने विक्रम प्रस्थापित
मैदानावरील खेळासोबतच पाटीदारने खेळाडूंच्या वैयक्तिक शैलीवरही भाष्य केले. ‘सर्वात स्टायलिश’ किंवा चांगले कपडे घालणारा खेळाडू कोण, या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने पुन्हा एकदा विराट कोहलीची निवड केली. तसेच, आयपीएलमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्याने आरसीबीचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस याचे नाव घेतले.



























































