
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता अमेरिकेची विनाशकारी युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन इराणजवळ आली आहे. त्यामुळे आता इराणने अमेरिकेला इशारा देत आम्हीही युद्धासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता दोन्ही देशातील संघर्ष वाढण्याची चिन्हे असून आखाती देशात युद्धाचे ढग जमत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराण चर्चेताठी तयार आहे. मात्र, त्यानंतर इराणने आम्ही युद्धासाठी तयार असल्याचे विधान केले. त्यामुळे दोन्ही देशातील शाब्दिक युद्ध वाढले आहे. त्याचवेळी अमेरिकेची सर्वात विनाशकारी युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन आता इराणजवळ आली आहे. त्यामुळे आखाती देशात युद्धाचे ढग जमत आहेत.
अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन संपूर्ण ताफ्यासोबत इराणजवळ आली आहे. ही युद्धनौका इराणच्या पूर्ण सैन्याचा नाश करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते. या युद्धनौकेसोबत गाईडेड मिसाइल क्रूझर, डिस्ट्रॉयर, पाणबुड्या आणि इतर जहाजांचा समावेश असलेला स्ट्राइक ग्रुप आहे. यूएसएस अब्राहम लिंकन ही समुद्रातील सर्वात मोठी ऑपरेशनल युद्धनौका मानले जाते. या युद्धनौकेवर अमेरिकेचे सर्वात घातक लढाऊ विमान तैनात आहेत. अब्राहम लिंकन शत्रूवर जमीन, समुद्र आणि हवेतून विनाशकारी प्रहार करू शकते.
अमेरिकेकडे अशी पाच शस्त्रे आहेत त्याचा प्रतिकार करण्यासाठी इराण सक्षम नाही. इराण-इस्रायल युद्धादरम्यान, बी-२ बॉम्बर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्सनी इराणच्या अणु सुविधा नष्ट केल्या. इराणी सैन्याची हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार अमेरिकन बी-२ बॉम्बर्स शोधण्यात अयशस्वी ठरले. अमेरिकेत ५२ नवीन बी-२ बॉम्बर्स विकसित केले जात आहेत यावरून असे सूचित होते की अमेरिका युद्धाबाबत काहीतरी गंभीर विचार करत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल अलर्ट मोडमध्ये आहे. इराणकडून होणाऱ्या कोणत्याही संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


























































