धक्कादायक! चाचणीदरम्यान आपल्याच जहाजावर क्षेपणास्त्र सोडले, कमांडरसह 20 जवानांचा मृत्यू

10843

इराणमध्ये एक विचित्र दुर्घटना घडली आहे. येथे चाचणीदरम्यान इराणची युद्धनौका ‘जमरान’वरून आपल्याच देशाच्या एका जहाजावर क्षेपणास्त्र डागण्यात आले. या अपघातात 20 पेक्षा जास्त जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत.

‘अनाडोलु’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जमरान’वरून मैत्रीपूर्ण फायर दरम्यान एक क्षेपणास्त्र चुकून ‘कोनाराक’ या जहाजावर डागण्यात आले. या जहाजावर इराणच्या नौदलात नुकतेच भरती झालेले 30 ते 40 जवान होते. या दुर्घटनेत कमांडरश 20 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. जखमींना नौदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मानवी चूक
दरम्यान, इराणची ‘इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ने (आयआरजीसी) ही घटना मानवी चूक असल्याचे म्हंटले आहे. यावर इराणच्या सैन्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पुढील काही तासात इराणचे नौदल यावर अधिकृत प्रतिक्रिया देईल.

screenshot_2020-05-11-15-05-05-227_com-twitter-android

याआधी विमान पाडले
याबाबत माहिती देताना स्थानिक पत्रकारांनी सांगितले की, जमरान या युद्धनौकेवरून भेदक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात येत होती. याच्या कचाट्यात लॉजीस्टिक जहाज कोनाराक आले आणि ही दुर्घटना घडली. यात जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याआधी जानेवारी महिन्यात आयआरजीसीने चुकून एका युक्रेनच्या विमानाला पाडले होते. यात विमानातील सर्वच्या सर्व 176 प्रवाशांचा आणि सदस्यांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या