इराणमध्ये सापडला तेलाचा विशाल साठा

1852

इराण मध्ये तेलाचा एक विशाल साठा सापडला असून गेल्या दशकात इराणच्या अर्थव्यवस्थेतील वाटचालीत हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.अशी माहिती इराणचे राष्ट्रपती ‘हसन रुहानी’ यांनी दिली आहे.रविवारी राजस्थानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हा तेलसाठा सापडल्याचे सांगितले.

ह्या नवीन तेलसाठ्यामुळे इराणमधील तेलाच्या साठ्यात सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे .दक्षिण-इराणच्या 2400 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे तेल क्षेत्र पसरलेले आहे.तेल निर्यात करणाऱ्या देशाची संघटना (ओपेक) म्हणजेच ‘ऑर्गेनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज्’ चा इराण हा संस्थापक देश मानला जातो.

53 अब्ज बॅरल भरतील एपढा हा तेलाचा साठा आहे. यामुळे इराणच्या अहवाज तेल क्षेत्रानंतर 65 बॅरलसह हे आता दुसरे मोठे तेल क्षेत्र झाले आहे .इराण हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असून तो दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सची निर्यात करतो.इराणकडे आता सध्या प्रमाणित तेलाचा साठा 155.6 अब्ज बॅरल आहे. गेल्या महिन्यात नैसर्गिक वायूच्या नव्या शोधामुळे त्यांच्या उत्पन्नात 40 अब्ज डॉलर्सची भर पडेल असे इराणने जाहीर केले होते.अमेरिकेच्या इनफॉर्मेशन एनर्जी एडमिनिस्ट्रेशन नुसार इराण हा जगातील चौथा सर्वात मोठा तेल साठा असलेला आणि दुसर्‍या क्रमांकाचा गॅस साठा असणारा देश आहे. ह्या नवीन भांडाराची घोषणा करताना रुहानी यांनी अमेरिकेला टोला दिला.वृत्तसंस्था ए.एफ.पी.नुसार, रूहानी म्हणाले,” आमचा देश हा एक श्रीमंत देश आहे. कठोर निर्बंध असतानाही, इराणच्या तेल उद्योगातील इंजिनिअर आणि कामगारांनी नवीन तेल क्षेत्र शोधले आहे.”

आपली प्रतिक्रिया द्या