आयर्लंडच्या मास्टर माइंडचा राजीनामा, टी-20 मालिका विजयानंतर प्रशिक्षक मलान यांनी संघाची सोडली साथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगज्जेत्या टीम इंडियाचा ऐतिहासिक पराभव केल्यावर आयर्लंडच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण हा त्यांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण हिंदुस्थानच्या या ऐतिहासिक पराभवाचे मास्टर माइंड आणि आयर्लंडचे मुख्य प्रशिक्षक हेनरिच मलान यांनी संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मलान यांच्या या निर्णयाने क्रिकेट विश्वातील बऱ्याच लोकांना मोठा धक्का बसला आहे.

बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडने निर्भेळ यश मिळवले. आयर्लंडच्या या ऐतिहासिक विजयानंतर 24 तासांच्या आतमध्येच मलान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मलान हे चार वर्षांहून अधिक काळ या पदावर होते. हिंदुस्थानविरुद्धच्या संघाच्या ऐतिहासिक मालिका विजयानंतर 45 वर्षीय मलान यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

आयर्लंडच्या संघाचे उच्च कामगिरी संचालक ग्रॅम वेस्ट यांनी मलान यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि सांगितले की, ‘आमची 2027 विश्वचषक पात्रता फेरीच्या तयारीसंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. मलान यांनी स्वतः या टप्प्यावर प्रशिक्षकपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली.

मलान यांचा आयर्लंडबरोबरचा प्रवास

2022 मध्ये प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या हेनरिक मलान यांच्या मार्गदर्शनाखाली आयर्लंडच्या क्रिकेटने यशाची नवी उंची गाठली. त्यांच्या कार्यकाळात संघाने सलग तीन टी-20 विश्वचषकांसाठी पात्रता मिळवली. आयरिश क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या तीन कसोटी सामन्यांतील विजयांचे ते शिल्पकार होते. मलान यांच्या कार्यकाळात आयर्लंडने इंग्लंडला धूळ चारली होती.