मृत्यूपूर्वी इरफानने कोरोना रुग्णांसाठी जमा केली होती आर्थिक मदत, मित्राने दिली माहिती

924

अभिनेता इरफान खानचा मृत्यू होऊन एक महिना झाला आहे. तरी अजूनही प्रेक्षकांच्या मनात इरफानच्या आठवणी ताज्या आहेत. इरफान खान मृत्यूपूर्वी कोरोना रुग्णांसाठी आर्थिक मदत गोळा करत होता अशी माहिती त्याच्या मित्राने दिली आहे. स्वतः आजारी असताना दुसर्‍यांची मदत करण्याची त्याची सवय सुटली नव्हती.

इरफानचा जयपूरमध्ये राहणारा मित्र जियाउल्लाह याने दिलेल्या माहितीनुसार इरफानला कळाले की त्याचे मित्र कोरोना रुग्णांसाठी निधी गोळा करत आहेत. तेव्हा इरफान स्वतःहून पुढे येत त्याने या कामी मदत केली. फक्त ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये अशी अट इरफानने ठेवली होती. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळता कामा नये असे इरफान म्हणायचा. लोकांची मदत केली पाहिजे पण त्याचा गाजावाजा होता कामा नये अशी इरफानची वृत्ती होती. जेव्हा कोणीही संकटात असायचं तेव्हा इरफान त्यांना मदत करायचा असे जियाउल्लाहने नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या