अल्पवयीन मोलकरणीवर आयआरएस अधिकाऱ्याचा अत्याचार

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

अल्पवयीन मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आयकर विभागाचे उपायुक्त आयआरएस अधिकारी वीरभद्रा विसलवाट (42) यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टाने त्यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वीरभद्रा विसलवाट यांच्याकडे एक 17 वर्षांची मुलगी मोलकरीण म्हणून कामाला आहे. गेल्या महिन्यात तिने पोलीस ठाण्यात येऊन विसलवाट यांनी बलात्कार केल्याची तक्रार दिली.

फेब्रुवारी 2017 मध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बलात्कार आणि ‘पोक्सो’ अन्वये गुन्हा दाखल करून गुरुवारी वीरभद्रा विसलवाट यांना अटक केल्याचे सांगण्यात आले. मूळचे हैदराबादचे असलेले विसलवाट हे गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरकारी निवासस्थानात राहतात. विसलवाट यांना अटक करून कोर्टात हजर केले होते.

summary- IRS officer arrested for raping minor