झोपण्याआधी पिस्ता खाणे आरोग्यासाठी चांगले असते का? वाचा…

पिस्ता खायला बऱ्याच जणांना आवडतात. खासकरून मीठ लावलेले पिस्ते. कारण हे पौष्टीक आणि चवीलाही छान असतात. पिस्ता खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. आज आपण याचबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

पिस्ता हा पचनासाठी फार उत्तम मानला जातो. जो आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी खूप योगदान देतो. मेंदू ते हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत या स्वादिष्ट सुकामेवा सेवन केल्याने तुम्ही अनेक फायदे पाहू शकता. म्हणूनच आपल्या नियमित आहारात पिस्ता समाविष्ट करणे उत्तम असल्याचे म्हणाले जाते.

पिस्ताचं सेवन कधी करावे

रात्री चांगली झोप येण्यासाठी पिस्ता खाण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे पिस्ता रात्री झोपण्याआधी नक्की खावा. याचा उष्मांक जास्त प्रमाणात नाही. तसंच यात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि प्रथिने समृद्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला अगदी छान झोप लागेल. मात्र पिस्ता आरोग्यदायी आहे म्हणून त्याचं अतिसेवनही करू नका. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना अतुल विश्वकर्मा यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या