वयाने 24 वर्ष मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला ‘हा’ अभिनेता, फोटो व्हायरल

6731

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’, ‘प्रेमाला वयाचे बंधन नसते’, अशा दिलखेचक टॅगलाईन घेऊन बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत. बॉलिवूड चित्रपटांसह सध्या वेब सीरिजमध्येही प्रेमांकूर फुलताना दिसत आहे. अशाच एका आगामी वेब सीरिजचे पोस्टरचा फर्स्ट लुक लॉन्च करण्यात आला आहे. या पोस्टरमधील अभिनेता आपल्यापेक्षा वयाने 24 वर्ष मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे. ईशान खट्टर असे या अभिनेत्याचे नाव आहे.

अभिनेता ईशान खट्टर हा सध्या ‘अ सूटेबल बॉय’ या आपल्या आगामी वेब सीरिजच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. या वेब सीरिजामध्ये ईशानसोबत अभिनेत्री तब्बू दिसणार आहे. याचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. ईशानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा एक फोटो शेअर केला आहे.

ईशानने शेअर केलेल्या पोस्टरवरून असे दिसून येते की एक तरुण हा देहविक्रय करणाऱ्या एका सुंदर महिलेच्या प्रेमात पडला आहे. झोपाळ्यावर मंत्रमुग्ध होऊन तो समोरील स्त्रीचे सौंदर्य न्याहाळताना यात दिसत आहे. ‘अ सूटेबल बॉय’ वेब सीरिजमध्ये ईशान एका कॉलेजमधील विद्यार्थ्याची भूमिका करणार आहे, तर तब्बू देहविक्रय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे.


View this post on Instagram

A Suitable Boy.. first look

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on

इशान खट्टर हा श्रीमंत घराण्यातील मुलगा दाखवण्यात आला आहे. मान असे या भूमिकेचे नाव असून तो आपल्या वडिलांचा तिरस्कार करताना दाखवण्यात आले आहे. यात मान हा सईदा नावाच्या एका देहविक्रय करणाऱ्या महिलेकडे आकर्षित होताना दाखवण्यात आले आहे. सईदाची भूमिका तब्बूने केली असून जून 2020 मध्ये ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या