रोहित, इशांत ऑस्ट्रेलियाला जाणार नाही – बीसीसीआय

रोहित शर्मा व इशांत शर्मा हे दोन प्रमुख क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार नाही आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली.

एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले. या दोघांसह विराट कोहलीचीही अनुपस्थिती कसोटी मालिकेत असणार आहे. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौरा टीम इंडियासाठी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. श्रेयस अय्यरला पर्यायी फलंदाज म्हणून कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, रोहित शर्मा व इशांत शर्मा यांच्या ऑस्ट्रेलियन दौर्याबाबत मीडियामधून ज्या बातम्या समोर येत आहेत त्या चुकीच्या आहेत असेही त्यांच्याकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या