#SriLankaBlasts इसिसने स्वीकारली श्रीलंका स्फोटांची जबाबदारी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रविवारी इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 321 लोकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिस या आंतरराष्ट्रीय कुख्यात दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. आमचे प्रमुख लक्ष्य हे ख्रिश्चन धर्मीय होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे मित्र पक्ष हे आमच्या रडारवर आहेत अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला पत्र पाठवून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याची कबुली दिली आहे.