इसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन

2021

इसिस या दहशतवादी संघटनेच्या तब्बल 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला इराकी लष्कराने मोसूल शहरातून अटक केली आहे. जब्बा ए जिहादी या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध होता मात्र त्याचे खरे नाव अबु अब्दुल बारी होते. तो इसिसचा एक मोठा दहशतवादी होता.

जब्बा ए जिहादीचे वजन 250 किलो असल्याने त्याला चालता येत नव्हते. तो सोशल मीडियावर वादग्रस्त भाषणं द्यायचा. तसेच त्याने इसिसचे समर्थन न करणाऱ्या अनेक मौलवींच्या हत्येचे फतवे देखील काढले होते. काही दिवसांपूर्वी त्याला अटक करायला इराकी सैन्य आले तेव्हा त्यांनी स्वत:सोबत क्रेन व पिकअप ट्रक देखील आणला होता. जब्बा ए जिहादीला त्याच्या घरातून बाहेर काढण्यासाठी घराच्या भिंती देखील तोडाव्या लागल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या