लेफ्टनंट जनरल फैझ हमीद बनले ‘आयएसआय’चे नवे प्रमुख

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

पाकिस्तानी लष्कराने लेफ्टनंट जनरल फैझ अहमद यांची इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स या गुप्तचर यंत्रणेचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली. विद्यमान आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना केवळ 8 महिन्यांतच पदावरून हटवण्यात आले आहे.

पाकिस्तानी लष्कराने 12 एप्रिल रोजी मेजर जनरल हमीद यांना लेफ्टनंट जनरल पदी पदोन्नती देताना त्यांची लष्करी मुख्यालयात अँडज्युटंड जनरल म्हणून नियुक्ती केली होती. फैझ हमीद यांनी यापूर्वी आयएसआयचे अंतर्गत प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांचे हमीद हे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, लेफ्टनंट जनरल मुनीर यांची कॉर्पल कमांडर गुजरानवाला म्हणून नियुक्ती झाली आहे.