#Corona रेल्वेच्या जुन्या प्रवासी गाड्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर करणार

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात संचारबंदी लागू केली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत चालला असून आतापर्यंत हा आकडा 800 पार गेला आहे. दरम्यान कोरोना टास्क फोर्समधील डॉ. गिरिधरन यांनी हिंदुस्थान तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

तिसऱ्या टप्प्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात लढा देण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात पावले उचलत आहे. सरकारकडून अंगणवाडी सेविका, आशाताई यांना पॅरामेडिक्सचे प्रशिक्षण देत आहे. तसेच आता विलगीकरण कक्षांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वेच्या जुन्या प्रवासी गाड्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर करण्यात आले आहे. स्लीपर कोचमधील मधला बर्थ तसेच साईडचे बर्थ काढून टाकण्यात आले आहेत. तसेच वरच्या बर्थवर चढण्यासाठी दिलेल्या शिड्या देखील हटविण्यात आल्या आहेत. बाथरुम स्वच्छ करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या