नाशिकमध्ये विलगीकरण कक्ष

मुंबईत कोरोनाने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोनाने दोघांचा मृत्यू झाल्याचे कळताच आम्ही विशेष काळजी घेत आहोत. रविवारीच दहा बेडच्या विलगीकरण कक्षाची सज्जता करण्यात आली, अशी माहिती जिल्हा शक्य चिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी दिली. कोरोनाची लक्षणे आढळल्यास संशयित रुग्णांची जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्याच्या सूचना ग्रामीण भागातील रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र बागुल यांनी सांगितले.