
इस्रायलने मोठा हवाई हल्ला करत इराणला धक्का दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्समधील (IRGC) कुद्स फोर्सच्या वेपन्स ट्रान्सफर युनिटचे (युनिट 190) कमांडर बहनाम शाहरियारी यांना इस्रायलने ठार केले आहे. इस्रायलने इराणच्या गुप्तचर संस्थांच्या तीन वरिष्ठ सैन्य कमांडसह एकूण 15 सैनिक मारले आहेत. इराणच्या इस्फहान अण्विक केंद्रावरही इस्रायलने हल्ला केला आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्स म्हणजे IDF ने या बाबत माहिती दिली आहे. IRGC मधील कुद्स फोर्सच्या वेपन्स ट्रान्सफर युनिटचे कमांडर बहनाम शाहरियारी पश्चिम इराणमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत, असे आयडीएफने म्हटले आहे.
🔴ELIMINATED: Behnam Shahriyari, commander of the Quds Force’s Weapons Transfer Unit in the IRGC, was eliminated in a precise IDF strike in western Iran.
Shahriyari was responsible for all weapons transfers from the Iranian regime to its proxies across the Middle East in order… pic.twitter.com/O9nEjuauuW
— Israel Defense Forces (@IDF) June 21, 2025
इस्रायलपासून किमान 1000 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाहरियारी यांना त्यांच्या कारमध्येच आयडीएफने ठार केले. शाहरियारी हे पश्चिम इराणच्या दिशेने निघाले होते. आखाती देशांत आपल्या साथिदारांपर्यंत शस्त्रास्त्रे पोहोचवण्याची जबाबदारी शाहरियारी यांच्यावर सोपवण्यात आली होती. इस्रायल उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने ते गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी संघटनांना शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम करत होते. शाहरियारी हे हिज्बुल्ला, हौती आणि हमास यारसख्या संघटनांसोबत काम करत होते. त्यांना मिसाइल आणि रॉकेटसह अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवत होते, असा इस्रायलचा दावा आहे.
🔴ELIMINATED: Saeed Izadi, a founder of the Iranian regime’s plan to destroy Israel, was eliminated in a precise IDF strike in the area of Qom.
Izadi was also the commander of the Palestine Corps of the Quds Force, a key coordinator between the Iranian regime and Hamas, and… pic.twitter.com/ICPna4O4no
— Israel Defense Forces (@IDF) June 21, 2025
इराणच्या सैन्याचा एक वरिष्ठ कमांडर सईद इजादीही कोममध्ये मारला गेला आहे. इजादी हा कुद्स फोर्सचा कमांडरही होता. इजादी इराण सरकार आणि हमास यांच्यातील मुख्य समन्वयक होता. तो आयआरजीसीच्या वरिष्ठ कमांडर आणि हमास आणि इराणी सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांमधील सैन्य समन्वयाची कमांड त्याच्या हाती होती. इस्रायल विरोधात दहशतवादी हल्ल्यासांठी इराण जी फंडिंग हमासला देत होता त्यात मोठी भूमिका इजादीची होती. यासह आयआरजीसीच्या दुसऱ्या यूएव्ही ब्रिगेडचे कमांडर अमीनपूर जोडाकी मारला गेल्याचा दावा इस्रायल डिफेन्स फोर्सने केला आहे.
Iran Earthquake- इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी? भूकंप नेमका कशामुळे झाला, तर्कवितर्क सुरू
इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 650 जणांचा मृत्यू झाला असून 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.