लेबनॉनमध्ये 17 सप्टेंबर रोजी पेजर स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात 300 हून अधिक हिजबुल्लाहचे दहशतवादी जखमी झाले तर अनेकांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचे म्हटले होते. मात्र वॉशिंग्टन पोस्टने या हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
वॉशिंग्टन पोस्टने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पेजर ऑपरेशनची योजना 2022 मध्येच आखण्यात आली होती. हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या एक वर्षआधीच या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती.
हिजबुल्लाह 2015 पासून हॅक-प्रूफ इलेक्ट्रॉनिक नेटवर्कच्या शोधात होता. यावेळी इस्रायली गुप्तचर संस्था मोसादने लेबनॉनला वॉकी-टॉकी पाठवण्यास सुरवात केली. हिजबुल्लाहला वॉकी-टॉकी वापरण्यास प्रवृत्त केले जात होते. यासाठी इस्रायलने तयारी केली होती.
पेजर हॅक करणे शक्य नव्हते. तसेच पेजर इस्रायल आणि यूएसए सारख्या देशांनी बनवलेले नाहीत, हे हिजबुल्लाहला माहित होते. यामुळे त्याने तैवानी ब्रँडचे अपोलो पेजर विकत घेतले. ही कंपनी इस्रायलशीही जोडलेली नव्हती.
यानंतर हिजबुल्लाहने पेजर खरेदी करण्यासाठी मार्केटिंग अधिकाऱ्याची मदत घेतली. त्याने अपोलो ब्रँड पेजर विकण्याचा परवाना घेतला होता. या दोघांमध्ये 2023 मध्ये हा करार झाला होता. त्यानेच हिजबुल्लाहला AR924 पेजर खरेदी करण्यास मनवले. या पेजर्सच्या बॅटरीमध्ये स्फोटके लपवण्यात आली होती. मात्र तैवानच्या कंपनीला या योजनेची माहिती नव्हती.
अनेक इस्रायली अधिकाऱ्यांनाही या हल्ल्याच्या परिणामाची माहिती नव्हती. हिजबुल्लाचा वाढता धोका लक्षात घेऊन इस्रायलने हा निर्णय घेतला होता. यानंतर कोडेड मेसेज येताच पेजरचा स्फोट झाला.